इतिहासातली तिची पानं
.jpg)
इतिहास हा जेत्यांनी लिहिलेला असतो असं म्हटलं जातं. त्याचबरोबर इतिहास हा 'जेत्यांच्या जेंडर'ने लिहिलेला असतो असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. आपल्या सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक इतिहासातील स्त्रियांचं योगदान आज काही अंशी प्रकाशात येऊ लागलं असलं तरी त्यासाठी स्त्रियांना मोठाच लढा द्यावा लागला आहे हे विसरून चालणार नाही. इतिहासातील स्त्रियांच्या विविधांगी योगदानाची नोंद ठेवणारं, इतिहास वाचत असताना सुटलेले काही धागे जोडणारं हे सदर त्या दृष्टीने महत्त्वाचं आहे.