२१ व्या शतकात तगण्यासाठी
पर्यावरणीय संतुलन हा आजचा अत्यंत कळीचा विषय केंद्रस्थानी ठेवून मानवी जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये (अन्नधान्य निर्मिती, पाणी, ऊर्जा, कचरा व्यवस्थापन इ.) आपल्याला नेमके काय बदल करावे लागतील, कसे करावे लागतील हे सविस्तरपणे मांडणारी प्रियदर्शिनी कर्वे यांची लेखमालिका.
हा ‘पैसा’ नावाचा इतिहास आहे
मानवी इतिहासाच्या संदर्भांत राजकीय, आर्थिक, सामाजिक, मानसिक या जगण्याच्या विविध बाजू एकमेकींवर सतत प्रभाव टाकत असतात. समूहजीवनावर विशेष ताकदीचा प्रभाव टाकणाऱ्या व्यवस्था म्हणून राजकीय आणि आर्थिक या दोन्ही व्यवस्थांचं गतिशास्त्र समजून घेताना समूहव्यवस्था, राष्ट्र, चलन, व्यापार यांचा संकल्पनात्मक इतिहास समजून घेण्यापासून प्रारंभ करावा घ्यावा लागतो आणि हा शोध आपल्याला ‘घटना’, ‘घटनेमागील कारणं’ आणि ‘घटनेचे परिणाम’ या मुख्य बिंदूंपाशी नेतो. ही साखळी अर्थातच गुंतागुंतीची आहे आणि या साखळीचा क्रम समजून घेणं आपल्या ‘ऐतिहासिक आकलना’त भर घालणारं आहे. औद्योगिक क्रांतीनंतरच्या जागतिक अर्थकारणाची पाळेमुळे आपल्यासमोर आणत, चलन आणि व्यापार या संदर्भाने विविध देशांमधील आंतरसंबंध तपासत एकविसाव्या शतकातील अर्थव्यवस्थेचं चित्र स्पष्ट करणारी आनंद मोरे यांची ही अभ्यासपूर्ण, आर्थिक गुंतागुंत सुलभतेने उलगडत जाणारी लेखमालिका याच जातकुळीतील आहे.
इतिहासातली तिची पानं
इतिहास हा जेत्यांनी लिहिलेला असतो असं म्हटलं जातं. त्याचबरोबर इतिहास हा 'जेत्यांच्या जेंडर'ने लिहिलेला असतो असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. आपल्या सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक इतिहासातील स्त्रियांचं योगदान आज काही अंशी प्रकाशात येऊ लागलं असलं तरी त्यासाठी स्त्रियांना मोठाच लढा द्यावा लागला आहे हे विसरून चालणार नाही. इतिहासातील स्त्रियांच्या विविधांगी योगदानाची नोंद ठेवणारं, इतिहास वाचत असताना सुटलेले काही धागे जोडणारं हे सदर त्या दृष्टीने महत्त्वाचं आहे.
Little Big Things
This series of short stories is based on real life experiences of a single mother. Seen through the eyes of a child, the stories present an account of childhood marked with an interesting blend of thoughts and feelings. The mother-daughter relational dynamics, their response to their environment and the mother’s perceptive approach as a parent – everything will win your heart. The stories underline the fact that a child can be totally happy, secure and confident in a single parent family. Happy reading!