कर्मयोगी रसायनशास्त्रज्ञ डॉ. असिमा चॅटर्जी
तेजस्विनी देसाई
०७ सप्टेंबर २०२१
'श्रम हीच पूजा हे तत्त्व पाळत जिवंत असेपर्यंत माझी काम करण्याची इच्छा आहे' असा निर्धार व्यक्त करणाऱ्या विख्यात रसायनशास्त्रज्ञ डॉ. असिमा चॅटर्जी यांचा परिचय या लेखातून करून घेऊ. डॉ. इंद्र नारायण मुखर्जी आणि कमलादेवी या बंगाली दांपत्याचे हे पहिले अपत्य. त्यांचा जन्म २३ सप्टेंबर, १९१७ रोजी कलकत्ता (आता कोलकाता) येथे झाला. पेशाने डॉक्टर असले तरी मुखर्जी यांना वनस्पतीशास्त्रात, विशेषतः औषधी गुणधर्म अस…
मिले सुर मेरा तुम्हारा... तो सुर बने हमारा!
बार-आयलन युनिव्हर्सिटी
२५ ऑगस्ट २०२१
संगीत हे एक असे साधन आहे, ज्याने आपल्या उत्क्रांतीच्या प्रवासात आपल्याला साथ दिली आहे. हजारो वर्षांपासून ते आपल्याला आपण समाजाशी जोडले असल्याचा दिलासा देत आले आहे. अमेरिकन सायकॉलॉजिस्ट या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या नवीन संशोधनामध्ये सामाजिक संबंधांबाबतचे मज्जाशास्त्रीय आकलन मांडले गेले आहे. त्यासाठी संशोधकांनी संगीत चालू असताना मेंदूमध्ये चालू असलेल्या घडामोडी दाखवणाऱ्या मेंदूच्या एका नवीन मॅपचा…
हवामानशास्त्रज्ञ अन्ना मणी
तेजस्विनी देसाई
१९ ऑगस्ट २०२१
ज्या काळात भारतातील मुलींचे साक्षरतेचे प्रमाण एक टक्क्यापेक्षा कमी होते, उच्च शिक्षण, संशोधन क्षेत्रात येणाऱ्या मुलींचे प्रमाण अतिशय नगण्य होते, त्या काळात ज्यांनी पदार्थविज्ञान विषयात संशोधन करण्याचे स्वप्न फक्त पाहिलेच नाही, तर ते स्वप्न पूर्ण करून पुढे हवामान शास्त्रातील उपकरणांबाबत भारताला आत्मनिर्भर बनवण्याच्या दिशेने एक पाऊल टाकले त्या ज्येष्ठ व श्रेष्ठ शास्त्रज्ञ म्हणजे अन्ना मणी.
अन्…
उसात गोडवा भरणाऱ्या शास्त्रज्ञ - डॉ. जानकी अम्मल
तेजस्विनी देसाई
२९ जुलै २०२१
समाजातील सर्वच स्तरांवर महिलांच्या कामाची विशेष दखल घेतली जात नाही. बऱ्याचदा त्याची नोंदही केली जात नाही. शिक्षण - संशोधन क्षेत्रही त्याला अपवाद नाही. याचे उत्तम उदाहरण म्हणजे जानकी अम्मल एडावलाथ कक्कट! खरं तर शिक्षण - संशोधन क्षेत्रातील विकासाच्या टप्प्यांवर सुवर्णाक्षरांनी हे नाव कोरायला हवं. पण आपण इतके करंटे की, संशोधनाच्या इतिहासातील मोजकीच पाने त्यांच्यासाठी खर्ची घातली. वनस्पतीशास्त्र - विश…
काळोखातील अग्निशिखा : कादंबिनी,रखमाबाई आणि हैमबती
तेजस्विनी देसाई
१४ जुलै २०२१
जवळ जवळ दीड शतकापूर्वीच काळ. अनिष्ट रुढी परंपरांमध्ये जखडलेला आणि अंधारात चाचपडणारा समाज. स्त्रियांची स्थिती तर आणखीनच हलाखीची.शिक्षण नाही, घरातील कर्त्या पुरुषाच्या मर्जीवर चालणारं कठपुतळीसारखं जीवन. ज्ञानप्रकाशच काय नैसर्गिक सूर्यप्रकाश देखील काही जणींना अप्राप्य! या पार्श्वभूमीवर महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींची शाळा सुरू केली. विद्येच्या प्रांगणात मुलींचे पहिले पाऊल पडले…
विज्ञानातील भारतीय तारका
तेजस्विनी देसाई
२४ जून २०२१
अलीकडेच एका मैत्रिणीशी विज्ञान - तंत्रज्ञान व संशोधन क्षेत्रात अग्रणी असणाऱ्या महिला शास्त्रज्ञांविषयी चर्चा करत होते. अचानक ती म्हणाली, "भारतात कुठे अशा वैज्ञानिक आहेत? आंतरराष्ट्रीय पातळीवर ख्याती असलेल्या तर अगदीच कमी." तिच्या या प्रश्नावर मी अवाक झाले. कारण भारतीय महिला शास्त्रज्ञ म्हटलं की, इरावती कर्वे, कमला सोहोनी, कल्पना चावला, सुनीता विल्यम्स यांच्यापुढे आपली यादी सरकत नाही. शांतीस्वरूप …
कोरोना काळ : अस्तित्वाचा खरा अर्थ शोधण्याची संधी
गौरी जानवेकर
१८ जुलै २०२०
कोविड १९ मुळे आपण सगळेच अनेक वेगळ्या अनुभवांना सामोरे गेलो आणि अजून पुढील काही महिने जाणार आहोत. आपण कधीच करणार नाही अशा अनेक गोष्टी आपण या काळात केल्या आणि जे आपण कायम करत राहू असं आपल्याला वाटलं अशा अनेक गोष्टींपासून आपल्याला बराच काळ वंचित राहावे लागले. कोरोना आणि लॉकडाऊन दोन्हीचे वेगळे मानसिक परिणाम आपण सगळ्यांनी अनुभवले. संसर्ग होण्याच्या भीतीपासून भविष्यात काय मांडून ठेवलंय अशा चिंतेपर्यंत स…
पर्यावरण संतुलन : खरं आव्हान बाजारपेठेचं आहे!
अतुल देऊळगावकर
१५ जून २०२०
कोरोना आणि जागतिक हवामान बदल या दोन्ही गोष्टी निसर्ग विनाशाच्या उत्पत्ती आहेत हे आपण लक्षात घ्यायला हवं. दोन्हीच्या मुळाशी 'निसर्गाचा विनाश' हेच कारण आहे. हवामानबदलाचं कारण कार्बन उत्सर्जनात वाढ झाल्याने होणारी प्रदूषण वाढ हे आहे, पण प्रदूषणामुळे निसर्गावर विपरीत परिणाम आणि त्यातून तापमानवाढ अशी मूळ साखळी आहे. कोरोनाबाबत सध्या जगातले जे संसर्गजन्य रोगतज्ञ आहेत ते काय सांगतायत? जंगलविनाश वेगात सुरू…
कोरोना आणि त्याचे पडसाद
छाया दातार
१० जून २०२०
’डाऊन टू अर्थ’ हे पाक्षिक दिल्लीच्या सेन्टर फॉर सायन्स आणि एन्व्हा्यर्न्मेंट (CSE) या संस्थेकडून चालवलं जातं. सध्या त्या संस्थेकडून कोरोनासंबंधित सर्वच जीवनव्यवहारांवर पडणाऱ्या छायेविषयक किंवा परिणामांविषयक दररोज काही लेख प्रसिद्ध केले जात आहेत. हे लेख छोटे असतात पण जगभरातील अनेक मासिकांतून प्रसिद्ध झालेल्या शास्त्रीय लेखांवर आधारित असतात. त्यातूनच मला बरेच शास्त्रीय ज्ञान झाले आहे. त्यातील काही म…