वचनबद्ध संबंध : प्रौढ एकल व्यक्तींच्या एकटेपणावरील उपाय
डॉ. हेमंत देवस्थळी
२१ ऑक्टोबर २०२६
लग्न किंवा लिव्ह-इनच्या पलीकडे जाऊन, प्रौढ एकल व्यक्तींच्या एकटेपणावर उपाय ठरू शकणारा आणखी एक पर्याय म्हणजे ‘वचनबद्ध संबंध’. डॉ. हेमंत देवस्थळी यांनी या लेखात या वेगळ्या संकल्पनेची मांडणी केली आहे. आपापलं स्वतंत्र आयुष्य जगत एकमेकांना भावनिक आधार देणं, मैत्री आणि एकनिष्ठतेतून नातं जपणं, हा या संकल्पनेचा गाभा आहे. मात्र अशा नात्यांकडे कुटुंब आणि समाज कसं पाहतो, यासोबतच कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि सामाज…