सिंड्रेला कॉम्प्लेक्स : स्त्रीच्या मनात दडलेले स्वातंत्र्याचे भय
डों. प्रतिभा कणेकर
०६ मार्च २०२०
एक मूल्य म्हणून व एक महत्त्वाचे जीवनदर्शन म्हणून विसाव्या शतकाच्या जगाने स्त्री-स्वातंत्र्याचा स्वीकार केला. परंतु स्त्री-स्वातंत्र्याची वाट स्त्रीसाठी सहज नव्हती. स्त्रीला स्वातंत्र्य मिळू नये म्हणून पुरुषसत्ताक प्रणालीने आपली वेगळी रणनीती आखणे एक वेळ समजण्यासारखे आहे. परंतु १९६०-७० च्या दरम्यान असे चित्र दिसू लागले की, स्त्रीला स्वातंत्र्याची जाणीव झाली खरी, पण स्वातंत्र्य पेलण्याइतकी तिच्या मना…