
‘अविनाशपासष्टी’
बाळासाहेब लबडे
१५ मार्च २०२२
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सेवानिवृत्त मराठी विभागप्रमुख प्राचार्य डॉ. अविनाश सांगोलेकर हे आद्य मराठी गझलसंशोधक म्हणून सर्वदूर सुपरिचित आहेत. त्यांचा ‘अविनाशपासष्टी’ हा ६५ निवडक गझलांचा संग्रह त्यांच्या पासष्टीतील पदार्पणाचे औचित्य साधून मुंबईच्या ग्रंथाली प्रकाशनाने १५ जानेवारी २०२२ रोजी प्रकाशित केला आहे. इ.स.१९७९पासून म्हणजे गेल्या चाळीस वर्षांपासून प्राचार्य डॉ. सांगोलेकर हे गझललेखन कर…