.jpg)
अॅड. अपर्णाताई रामतीर्थकर यांना खुले पत्र
विद्या बाळ
०६ मार्च २०२०
प्रिय वाचक, तुमच्यापैकी काहींनी तरी अपर्णा रामतीर्थकरांचं नाव ऐकलं असेल. काहींनी त्यांची व्याख्यानंही ऐकली असतील. मी ऐकलं आहे की, त्या महाराष्ट्रात सर्वदूर व्याख्यानं देत हिंडत असतात. त्यांच्या व्याख्यानांना श्रोत्यांचा खूप चांगला प्रतिसाद असतो. एवढंच नाही तर नव्या तंत्रज्ञानाचा आधार घेत, त्यांच्या व्याख्यानाच्या अनेक सीडीज सुद्धा ऐकल्या जातात. त्यांच्या व्याख्यानाच्या झंझावातानं मी अस्वस्थ झाल…