मारिओ
अल्बर्टो मोराव्हिया
०५ जून २०२१
फिलोमेना गाढ झोपलेली असतानाच मी भल्या पहाटे उठलो. माझी उपकरणांची पिशवी घेतली. आवाज न करता मी घराच्या बाहेर पडलो आणि ग्रामचीहून मॉंटे पॅरिओलीला गेलो. तिथे एका घरात गळक्या बॉयलरची दुरुस्ती करायची होती. दुरुस्तीला किती वेळ लागेल नक्की माहीत नव्हते. कदाचित दोनेक तास सहज लागतीलच. कारण पहिला पाईप काढून तो पुन्हा बसवावा लागणार होता. काम उरकल्यावर मी बस व ट्राम पकडून व्हिआ डे कॉरोनेरीला पोचलो. तिथेच माझं…