डांची (सांडणी)
उपेंद्रनाथ अश्क
१३ जुलै २०२१
पी. सिंकदर या लहान गावात बाकर या जाट मुसलमानाला आपल्या सामानाकडे लोभी नजरेने बघत असलेलं पाहून झाडाच्या सावलीमध्ये आराम करत असलेला नंदू चौधरी आपल्या मोठ्या आणि भेदक आवाजात ओरडला, “ए, ए काय करतो आहेस रे तिकडे?” हे म्हणत असताना त्याचा सहा फूट लांबीचा देह जो झाडाच्या सावलीमध्ये आराम करत पहुडला होता, तो खडबडून जागा झाला. त्याची छाती फुलून आली आणि बटणं तुटली असल्यामुळे, जाड्या-भरड्या खादीच्या कुर्त्यामध…