
अ वाइफ्स कन्फेशन
गाय द मोपासाँ
२० मे २०२३
माझ्या जीवनातली सर्वात सुंदर आठवण सांग असं तू मला म्हणालास; पण मित्रा, मी खूप वयोवृद्ध आहे. मला नातेवाईक, मुलंबाळं, सगेसोयरे नाहीत. त्यामुळे तुझ्याजवळ कबुलीजबाब द्यायला मी मोकळी आहे. मात्र, मला एक वचन दे. माझं नाव तू कोणासमोर उघड करणार नाहीस. माझ्यावर खूप जणांनी प्रेम केलं, हे तू जाणतोसच. मी माझ्यावरही अनेकदा प्रेम केलं. मी रूपवती होते. आज माझं सौंदर्य लयाला गेलं असलं, तरी मी आजही तसं म्हणू शकते…