मी काळ रांधत ठेवलाय
चिन्मय चिटणीस
२१ डिसेंबर २०२५
काही संग्रह हाती येण्याआधी त्याचे शीर्षकच आपल्याला त्याकडे आकर्षित करते, 'मी काळ रांधत ठेवलाय' हाच तो मुखपृष्ठही सुंदर झालेला संग्रह आहे. सन २०१२ रोजी संग्रह आल्यानंतर आता २०२५ पर्यंत थांबून, डॉ. नीलिमा गुंडी यांचा चौथा कविता संग्रह आता प्रकाशित झालेला आहे. 'काळाला नवा सर्जनशील आकार देता यावा लागतो हे काम सर्जनाशी निसर्गतःच जोडलेली स्त्री करू शकेल असा मला विश्वास वाटतो', आपल्या या संग्रहाच्या मनो…