मित्राची गोष्ट
जाई फराकटे
०८ जानेवारी २०२१
बऱ्याच वर्षांनी ‘वर्क फ्रॉम होम’च्या निमित्ताने कोकणातल्या आमच्या घरी आई-बाबांबरोबर राहण्याची संधी मिळाली. तेही बरेच दिवस. मग काय, आम्ही लॉकडाउनच्या सुरुवातीच्या दिवसांत जुन्या फोटोंचे अल्बम, आईने माझ्या आणि माझ्या बहिणीच्या शाळेच्या दिवसातल्या कपाटात सांभाळून ठेवलेल्या काही वस्तू, शुभेच्छापत्रांची थैली असं सगळं आठवणींचं गाठोडं उघडून तासनतास गप्पा मारत बसत असू. असंच एक दिवस माझ्या कप्प्यात …