स्त्री विमर्श: संकल्पना व स्वरूप. डॉ वृषाली किन्हाळकर ०२ डिसेंबर २०२५

स्त्री-विमर्शासारख्या शब्दाला अजूनही आपल्या मराठी वाचकांच्या मनात आपलेपणा लाभलेला नाही, पण या शब्दामागचं जग, त्याचे संघर्ष, इतिहासात अदृश्य राहिलेल्या असंख्य स्त्रियांचे आयुष्य, आणि समानतेसाठी झगडलेल्या पिढ्यांची तळमळ हे सगळं डॉ. रमा नवले यांच्या लेखणीतून इतकं सहज, साधं रूप घेऊन समोर येतं की हा विषय ‘अपरिचित’ राहातच नाही. हिंदी आणि मराठीत तेवढ्याच ताकदीने लिहिण्याचं अवघड कौशल्य असणाऱ्या नवले मॅडम …