गाब्रिएला मिस्त्राल : स्वत्वाचा शोध
तनवी जगदाळे
१० ऑगस्ट २०२१
"मी कविता लिहिते, कारण ती एक उफाळून येणारी प्रेरणा असते; ती आज्ञा पाळावीच लागते. नाहीतर ते म्हणजे गळ्यात दाटून येणारा झरा अडवणं होईल. जे अशक्यच असतं. वर्षानुवर्षे मी सेवा केली आहे त्या गीताची, जे अवतीर्ण होतं, जे गाडून टाकणं शक्य नसतं. मी जे अर्पण करते ते कोणाला मिळतं त्याला आता माझ्या दृष्टीने महत्त्व नाही. माझ्याहून श्रेष्ठ आणि खोल असं जे आहे, त्यापुढे लीन होऊनच मी स्वत:ला व्यक्त करते. मी केवळ ए…