न बोललेल्या भावनांचं स्टिअरिंग दीपा पिल्ले पुष्पकांथन ३१ डिसेंबर २०२५

नवरा–बायको संसाराची दोन चाकं असतात, चार भिंतींच्या खोलीला घरपण एका बाईमुळेच येतं, एक बाई शिकली तर तिचं संपूर्ण कुटुंब शिकतं—अशा म्हणी पूर्वापार चालत आल्या आहेत. तरीही, संसाराचं, घराचं, कुटुंबाचं स्टिअरिंग मात्र त्या बाईच्या हातात क्वचितच असतं, हे आजच्या सुशिक्षित समाजाचं कटू सत्य आहे. हेच सत्य हिनाकौसर खान या माझ्या मैत्रिणीने तिच्या ‘स्टिअरिंग’ या नव्या कथासंग्रहातून अत्यंत प्रभावीपणे उलगडलं आहे…