
लव्ह जिहाद : अर्थ आणि अनर्थ
निशा शिवूरकर
०२ जानेवारी २०२१
‘दोन सज्ञान किंवा प्रौढ व्यक्ती स्वेच्छेने एकत्र राहात असतील तर त्यांच्या शांतीपूर्ण सहजीवनात हस्तक्षेप करण्याचा कोणालाच अधिकार नाही’ असा स्पष्ट निर्देश अलाहाबाद उच्च न्यायालयाने ६ जानेवारी २०२० रोजी एका प्रकरणात दिला. शाहिस्ता परवीन ऊर्फ संगीता विरुद्ध उत्तर प्रदेश या प्रकरणातील आदेशात न्यायालयाने पुढे म्हटलंय – ‘हा स्वतंत्र आणि लोकशाही देश आहे, या देशात प्रौढ स्त्री-पुरुष आपल्या पसंतीप्रमाणे लग्…