
विचार आणि कृतींचे नवे आयाम
मिलिंद बोकील
०९ मार्च २०२१
विद्या बाळ आणि पुष्पा भावे यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनात, विशेषत: स्त्रीवादी चळवळीच्या क्षेत्रात, एक प्रकारची पोकळी जाणवणे साहजिकच आहे. ह्या दोन्ही स्त्रियांनी आयुष्यभर स्त्रीवादी चळवळीची पाठराखण तर केलीच, पण महाराष्ट्राच्या एकूण सामाजिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक क्षेत्रातही आपला ठसा उमटवला. विवेकनिष्ठ तरीही लडिवाळ, विचारी आणि कृतिशील, वस्तुनिष्ठ असूनही समंजस आणि मर्मज्ञ तरीही र…