बोरीबाभळी : ग्रामीण स्त्रीच्या वेदनांचा दस्तावेज
रंजना वांबुरकर
३० जुलै २०२१
‘बोरीबाभळी उगाच जगती चंदन माथी कुठार’ - ‘बोरीबाभळी’ हे शीर्षक वाचल्याबरोबर ग. दि. माडगूळकर यांच्या या ओळी आठवतात. ज्यांची कुठलीही निगा राखली जात नाही, ज्या कुठेही रानावनात रस्त्याच्या कडेला उगवतात, वाढतात आणि मोठया होऊन तशाच ऊन, वारा, धूळ-माती खात जगत राहतात अशा बोरीबाभळी. ना त्यांना देखणे रूप, ना कुठला सुवास, ना त्या कोणा पांथस्थाला सावली देऊ शकत. रावसाहेब रंगनाथ बोराडे लिखित ‘बोरीबाभळी’ या कथासं…