कोसबाडच्या टेकडीवरून
समीर गायकवाड
१० एप्रिल २०२६
1923 साली, अवघ्या तेराव्या वर्षी शंकर वामन जातेगावकर यांच्याशी अनुताईंचा बालविवाह झाला. विवाहाच्या दिवसानंतर अनुताईंना सासरचे किंवा पतीचे दर्शनही झाले नाही. कारण अजून पुढचे सोपस्कार बाकी होते, मात्र तेव्हढ्यातच वैधव्याची कुऱ्हाड त्यांच्यावर कोसळली. आपल्याला सासरचे व पतीचे दर्शनही झालेले नाही, तेंव्हा आपण सासरचे नाव का लावावे असा क्रांतिकारी विचार असणाऱ्या अनुताईंनी आपले माहेरचे ‘वाघ’ हेच आडनाव चाल…