संस्कृती संवर्धनात महिलांचा हातभार सुभाष हिराबाई अंतू खंकाळ ०५ जानेवारी २०२६

संस्कृती म्हणजे केवळ परंपरा किंवा रीतिरिवाज नाहीत, तर समाज जगण्याची पद्धत, मूल्ये आणि विचारांची सातत्याने घडणारी प्रक्रिया आहे. या प्रक्रियेत महिलांचा वाटा सुरुवातीपासूनच महत्त्वाचा आणि निर्णायक राहिला आहे. आदिम काळापासून शेती, कुटुंब, कला, भाषा, शिक्षण, आरोग्य, भक्ती, निसर्ग आणि सामाजिक मूल्यांची जपणूक करत महिलांनी संस्कृती जिवंत ठेवली आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली. पुरुषप्रधान समाजरचनेमुळे त्य…