चूल ते मूल : माझं गरजेपुरतं जगणं हृषीकेश पाळंदे ०९ ऑगस्ट २०२०

गरजेपुरतं जगायला लागल्यावर कशी मजा येत गेली, हे नीट सविस्तर सांगायलाच हा लेख लिहायला घेतला आहे. लिहिता लिहिता मी उपदेशांचे डोस पाजणार नाही, असं ठरवलेलं आहे. तरीसुद्धा मधूनच मी प्रवचनकार निसर्गयोगी बाबामहाराजांच्या भूमिकेत शिरू शकतो. हे बाबामहाराज निसर्गाचा भक्तिमार्ग अनुसरणारे आहेत. त्यामुळे ते उपदेशाचे डोस मी पाजत नसून ‘तो’ पाजत आहे नि ते आपल्या सर्वांच्या भल्यासाठी आहेत. माझा जन्म पुण्यातला. …

घराघरात, मनामनात नक्की आहे कोण? हृषीकेश पाळंदे २१ जून २०२१

अलीकडेच राजधानीतून आलेली बातमी : “आमच्या मुलांच्या वाट्याची लस परदेशात का पाठवली?” असं पोस्टर झळकवणार्‍यांविरुद्ध पोलिसांनी तातडीने कारवाई केली. मोठ्या पेपरच्या कुठल्यातरी छोट्या कोपर्‍यात आलेली ही बातमी वाचल्यावर नेहमीप्रमाणे अनेक प्रश्न पडायला सुरुवात झाली. प्रश्न जुनेच, नेहमीचेच - तेच तेच. नव्या प्रश्नांमुळे जुन्याजाणत्या विसरलेल्या प्रश्नांनाही जोर चढतो, नि त्याचं वादळ घोंघावत येतं. त्यातून…