
बालक पालक
मंदार काळे
१६ मार्च २०२१
मागील आठवड्यात तीन दशकांपूर्वी बॉलिवूडमध्ये कारकीर्दीच्या शिखरावर असलेल्या स्मृती विश्वास यांच्या वृद्धापकाळातील दारूण स्थितीबाबत बातमी वाचली. काही काळापूर्वी अशाच स्वरुपाची बातमी गीता कपूर या तुलनेने दुय्यम अभिनेत्रीबाबत वाचण्यास मिळाली होती. कारकीर्दीच्या भरात असताना मिळवलेला पैसा …

विझलेल्या मेणबत्त्या
मंगला सामंत
१३ मार्च २०२१
समाजामध्ये जेव्हा वाईट घटना घडतात, तेव्हा त्या घटनेभोवती, सामाजिक, मानसिक, आर्थिक, कौटुंबिक आणि काही मर्यादेपर्यंत स्त्री-पुरुषांची जैविक ठेवण यांचे वलय असते. या सर्व विषयांपर्यंत आपल्याला जेव्हा पोहोचता येते, तेव्हाच त्या घटनेमागील कारणे कळतात आणि जेव्हा कारणे कळतात, तेव्हाच या घटनेवरचे उपाय हाती येतात.
इथे विषय आहे तो स्त्रिया व मुला-मुलींवरचे लैंगिक अत्त्याचार आणि बलात्काराचा.
अशा घटना घड…

विचार आणि कृतींचे नवे आयाम
मिलिंद बोकील
०९ मार्च २०२१
विद्या बाळ आणि पुष्पा भावे यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनात, विशेषत: स्त्रीवादी चळवळीच्या क्षेत्रात, एक प्रकारची पोकळी जाणवणे साहजिकच आहे. ह्या दोन्ही स्त्रियांनी आयुष्यभर स्त्रीवादी चळवळीची पाठराखण तर केलीच, पण महाराष्ट्राच्या एकूण सामाजिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक क्षेत्रातही आपला ठसा उमटवला. विवेकनिष्ठ तरीही लडिवाळ, विचारी आणि कृतिशील, वस्तुनिष्ठ असूनही समंजस आणि मर्मज्ञ तरीही र…

निमित्त : नो नेशन फॉर विमेन
विद्या आपटे
०४ जानेवारी २०२१
’नो नेशन फॉर विमेन’ हे प्रियांका दुबे या पत्रकार महिलेचं भारतातल्या काही बलात्काराच्या घटनांचा तपशीलात मागोवा घेणारं पुस्तक वाचनात आलं आणि माझी झोप उडाली. वृत्तपत्रातून, दृकश्राव्य माध्यमातून बलात्काराच्या, महिलांवरील अत्याचाराच्या घटना समोर येणं ही नित्याची गोष्ट झाली आहे. घटना सत्य असते पण तिचे सर्व घटक – म्हणजे नेमकं काय घडलं, कशा परिस्थितीत, कोणत्या वातावरणात घडलं, शेजारी, गावकरी, गावातली वजन…

मागे न हटणाऱ्या इंदुताई
कुंदा प्रमिला नीळकंठ
०६ सप्टेंबर २०२०
कॉम्रेड इंदुताईंची आठवण आली की,
चल गं हिरा चल गं मीरा चल गं बायजाबाई
मागं काही नाही आता तटून उभी राही
असं ३०-४० बायकांसमोर खड्या आवाजात गाणं म्हणतानाचा त्यांचा दमदार-पुरुषी आवाज आजही माझ्या कानात घुमतो. स्त्रियांच्या चळवळीची गाणी आणि इंदुताईंचा अतिशय जिव्हाळ्याचा संबंध होता. १९८४ ते ८८ या काळात विटा, खानापूर, तासगाव, वाळवा तालुक्यातील गावात आम्ही फिरत असताना संघटना उभारणीच्या काळात ‘स्…

शिक्षककोंडी
परेश जयश्री मनोहर
०५ सप्टेंबर २०२०
शिक्षक हा भारतातला आणि विशेषतः महाराष्ट्रातला सगळ्यात जास्त बोलल्या जाणारा विषय. अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांच्या प्रमाणेच लोकांसोबत सगळ्यात जास्त संपर्कात येणारा शासकीय नोकरदार वर्ग. आधीच्या अनेक पिढ्या शिक्षक हा व्यवसाय नसून सेवाभावी पेशा आहे, इथपासून ते आता शिक्षक म्हणजे फुकट पैसे खाणारे, कमीत कमी काम करणारे लोक इथपर्यंतचा प्रवास या समूहाने केलेला आहे. शिक्षण क्षेत्रातील सगळ्याच बऱ्यावाईट गोष…

सामाजिक सामंजस्य आणि शिक्षणाची भूमिका
सायली दुबाश
०२ सप्टेंबर २०२०
अमेरिकेत जॉर्ज फ्लॉईड यांच्या दुर्दैवी मृत्यूने जगभरात विविध प्रकारे हळहळ आणि संताप व्यक्त करण्यात आला आहे. कृष्णवर्णीय आणि सवर्ण यांच्यातील वर्षानुवर्षे चालत असलेला संघर्ष या घटनेमुळे अतिशय ठळकपणे पुढे आला. जगभरात ‘सामाजिक सामंजस्य’ या विषयाला पुन्हा एकदा केंद्रस्थानी ठेऊन त्यावर काम करण्याची कशी गरज आहे यावर चर्चा सुरु झाली. या पार्श्वभूमीवर बहाई अकादमी या पाचगणी स्थित शैक्षणिक संस्थेच्या
पुढ…

'मिळून सार्याजणी'ची ३१ वर्षांची वाटचाल
गीताली वि. मं.
१२ ऑगस्ट २०२०
९ ऑगस्ट १९८९ रोजी ‘मिळून सार्याजणी’ मासिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला. भली भली मासिकं बंद पडण्याच्या मार्गावर असताना ज्येष्ठ स्त्रीवादी सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांनी हे मासिक सुरू करण्याचा धाडसी निर्णय घेतला. समाजाच्या मुख्य प्रवाहात स्त्री उद्गाराला पुरेसं स्थान नाही, तिच्यावर कुटुंबात - समाजात अन्याय होतो आहे, त्या अन्यायाला वाचा ङ्गोडायला हवी, या हेतूनं हे मासिक त्यांनी सुरू केलं. नावात…

अवलियांचा कुंभमेळा
समीर अधिकारी
०८ ऑगस्ट २०२०
कुंभमेळा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतो डोक्यावर जटा वाढवलेल्या, अंगाला राख फासलेला, उग्र, हातात त्रिशूळ वगैरे घेतलेल्या, चित्रविचित्र हावभाव करणाऱ्या, गंगेत स्नानासाठी धावणाऱ्या नग्न साधूंचा समूह. पण दरवर्षी एक असाही कुंभमेळा भरतो, जिथे वरवर सर्वसामान्यांसारखेच दिसणारे पण रुटीनपेक्षा काहीतरी वेगळं करणारे अवलिये ज्ञानगंगेत डुंबण्यासाठी धाव घेतात!
कल्पना करा की, जगभरातून जमलेल्या साताठशे लोकां…