यंत्राशिवाय उत्पादन करणारा एक कारागीर नोकरीला ठेवला तर तो चांगलं काम करत असला तरी त्याने तयार केलेली पहिली वस्तू आणि दुसरी वस्तू यात तंतोतंत सारखेपणा आणण्यासाठी त्याला जास्त मेहनत करावी लागेल. त्याच्या कारागिरीचा कस लागेल आणि त्याचा वेग मंदावेल. त्याला द्यायचा मोबदला त्याने केलेल्या उत्पादनाच्या गुणवत्तेवर आणि संख्येवर ठरेल. आणि तोही त्याने उत्पादन केल्यावर टप्प्याटप्प्याने द्यावा लागेल. म्हणजे भर…
१८७१ मध्ये एखाद्या देशाने गोल्ड स्टँडर्डमध्ये भाग घेतला म्हणजे आपोआप त्याच्या चलनाच्या एका एककाची किंमत इंग्लंड ठरवेल ती होत नव्हती. तर तुमच्या देशातील चलनाच्या एककाची किंमत त्यात सरकार किती सोने वापरेल किंवा त्याबदल्यात किती सोने द्यायला तयार होईल त्यावर ठरत होती. उदाहरणार्थ १८७१ मध्ये अमेरिकन सरकारने त्यांच्या एका डॉलरच्या नाण्यात १.५०९३ ग्रॅम सोने असेल किंवा एक डॉलरच्या नोटेच्या बदल्यात सरकार …
पहिल्या भागात जग सुवर्ण मानकांपर्यंत (गोल्ड स्टॅंडर्ड) कसे पोहोचले ते आपण थोडक्यात पहिले. आता सुवर्ण मानक किंवा गोल्ड स्टॅंडर्ड म्हणजे काय ते बघू. १८७० च्या आधी जगात पैशाच्या बाबतीत तीन वेगवेगळी मानके (स्टँडर्ड्स) होती. १) सिल्व्हर स्टॅंडर्ड : यात स्पेनचा बोलबाला होता आणि चीनच्या चांदीप्रेमामुळे याला प्रचंड महत्त्व आले होते. २) गोल्ड स्टॅंडर्ड : याकडे जगाची वाटचाल सुरु करण्यात ग्रेट ब्रिटनच…
मानवी इतिहासाच्या संदर्भांत राजकीय, आर्थिक, सामाजिक, मानसिक या जगण्याच्या विविध बाजू एकमेकींवर सतत प्रभाव टाकत असतात. समूहजीवनावर विशेष ताकदीचा प्रभाव टाकणाऱ्या व्यवस्था म्हणून राजकीय आणि आर्थिक या दोन्ही व्यवस्थांचं गतिशास्त्र समजून घेताना समूहव्यवस्था, राष्ट्र, चलन, व्यापार यांचा संकल्पनात्मक इतिहास समजून घेण्यापासून प्रारंभ करावा घ्यावा लागतो आणि हा शोध आपल्याला ‘घटना’, ‘घटनेमागील कारणं’ आणि ‘घ…