
या चैका! (महिला अंतराळयात्रींचा संघर्ष)
सुकल्प कारंजेकर
२८ मार्च २०२४
“मी सीगल बोलतेय. इकडे सगळं ठीक आहे. मला इथून खुलं क्षितिज दिसतं आहे: निळसर नितळ क्षितिजापलीकडे गडद अवकाशाचा खोल महासागर दिसतो आहे. तो मला खुणावतो आहे. इथून पृथ्वी खूप सुंदर दिसत आहे.” -
व्हॅलेंटीना तेरेश्कोव्हा (पहिल्या महिला अंतराळयात्री) यांच्या उद्गाराचा स्वैर अनुवाद
ऑक्टोबर २०१९मध्ये क्रिस्टिना कोच आणि जेसिका मेर या अंतराळयात्रींना एक महत्त्वाचं काम देण्यात आलं. पृथ्वीपासून सरासरी ४०…

'मिळून साऱ्याजणी' पुरस्कृत विद्या बाळ अध्यासन प्रकल्प - 2
गीताली वि. मं.
१८ सप्टेंबर २०२३
युनोनं 1975 हे वर्ष जागतिक महिला वर्ष म्हणून जाहीर केलं त्याला 2025 मध्ये पन्नास वर्ष पूर्ण होतील, त्यानिमित्त 1975 ते 2025 या 50 वर्षात महिलांसंदर्भात सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, राजकीय, कायदे, कला, क्रीडा, आरोग्य, शिक्षण, विज्ञान, तंत्रज्ञान, शेती, पर्यावरण, उद्योग आदी क्षेत्रात विशेषतः महाराष्ट्रात काय काय महत्त्वाच्या ठळक घटना, घडामोडी झाल्या त्याचा सामान्य स्त्री, पुरुष आणि एल.जी.बी.टी.आय.क…

सोलापुरी खाद्य भ्रमंती, शालामित्रा संगे!
सौरभ कुंभारे
०१ सप्टेंबर २०२३
या शनिवारी, २६ ऑगस्ट २०२३ला, सकाळीच सांगलीहून सोलापूरला येण्यास बसलो. अर्थात बस पंढरपूर मार्गे घेतल्यामुळे ती प्रथम रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्ग आणि सांगोल्यावरून मोहोळ मार्गे साधारण दुपारी एक वाजता सोलापूरच्या स्टॅन्ड वर आली. मित्र घ्यायला आला होताच! हा मित्रही खवय्या! गेल्या काही वर्षाच्या वास्तव्यामध्ये त्याने भरपूर छान छान authentic आणि हटके अशी खाद्य भ्रमंती केली होती, त्यामुळे त्याचा …

अ वाइफ्स कन्फेशन
गाय द मोपासाँ
२० मे २०२३
माझ्या जीवनातली सर्वात सुंदर आठवण सांग असं तू मला म्हणालास; पण मित्रा, मी खूप वयोवृद्ध आहे. मला नातेवाईक, मुलंबाळं, सगेसोयरे नाहीत. त्यामुळे तुझ्याजवळ कबुलीजबाब द्यायला मी मोकळी आहे. मात्र, मला एक वचन दे. माझं नाव तू कोणासमोर उघड करणार नाहीस.
माझ्यावर खूप जणांनी प्रेम केलं, हे तू जाणतोसच. मी माझ्यावरही अनेकदा प्रेम केलं. मी रूपवती होते. आज माझं सौंदर्य लयाला गेलं असलं, तरी मी आजही तसं म्हणू शकते…
-1 (1).jpg)
No Watery Eyes Challenge
गंधार पारखी
१५ मे २०२३
साल २००१.
आजही तिचा थिसिस नाकारला गेला.
तिच्या स्वीडिश प्रोफेसरने सांगितलेल्या सगळ्या करेक्शन्स करूनही.
सहा महिन्यांपूर्वीही असाच नाकारला गेला होता.
रूमवर येताना युनिव्हर्सिटीचे बर्फाळ रस्ते आपल्याला गडद काळोख्या बोगद्यात घेऊन जातायत, असं तिला वाटत होतं.
रूमवर पोचली तेव्हा तिची जर्मन रूममेट आपल्या गर्लफ्रेंडबरोबर बाहेर गेली होती.
तिला एकटीला रूमवर राहायची भीती वाटत होती. चार वर…

वंचितांच्या शिक्षणाचे आव्हान पेलणारी ’प्रयोगभूमी’
राजाराम कुंभार
०९ मार्च २०२३
या घटनेला वीसेक वर्षं झाली असतील. श्रीरामपूर येथील बी.एड् कॉलेजमध्ये प्राध्यापक होतो, आणि त्यावेळच्या ’उदयोन्मुख भारतीय समाजातील शिक्षण’ या पेपर क्रमांक एक मधील दुसरा शैक्षणिक समाजशास्त्राचा विभाग माझ्याकडे अध्यापनासाठी होता. त्यात ’वंचितांचे शिक्षण’ या अंतर्गत आदिवासींचे शिक्षण हा एक घटक होता. एके दिवशी मी तो शिकवला. त्यानंतर दुपारच्या सुट्टीत एक प्रशिक्षणार्थी माझ्या केबिनमध्ये आला आणि म्हणाला,…

८ मार्च : आंतरराष्ट्रीय महिला दिन जिंदाबाद!
गीताली वि. मं.
०९ मार्च २०२३
आज भारतामध्ये सर्व प्रौढ स्त्री-पुरुषांना मतदानाचा हक्क आहे. परंतु विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत संपूर्ण अमेरिका आणि युरोपसहित जवळजवळ जगभर स्त्रियांना मतदानाचा हक्क नाकारलेला होता. पुरुषप्रधान व्यवस्थेतील स्त्री-पुरुष विषमतेचं हे एक ढळढळीत उदाहरण. या अन्यायाविरुद्ध स्त्रिया आपापल्या परीनं संघर्ष करत होत्या. १८९० मध्ये अमेरिकेत मतदानाच्या हक्कासंदर्भात 'द नॅशनल अमेरिकन सफ्रेजिस्ट असोसिएशन'ची स्थ…

गाळाचे ढिगारे आणि तोडलेली बांधणं
परिणीता दांडेकर
०७ मार्च २०२३
सूर्य पश्चिमेला कलला होता. त्याची सोनसळी किरणं आजूबाजूला पसरली होती. आम्ही वाशिष्ठी नदीच्या एका उपनदीच्या पात्रात उभे होतो. अवघ्या ६५ वर्षांचे हरी गणपत निकम हे एखाद्या डॉल्फिनसारखा सूर मारून बांधणाखाली गेले. काहीच वेळात त्यांनी एक टोपली वर आणली. ती सुबकरीत्या विणलेली टोपली इतकी सुंदर होती की, ती बनवणार्या हातांना दुवा द्यावीशी वाटली. त्यांचा उजवा हात त्यांनी टोपलीच्या तोंडावर घट्ट दाबून धरला होता…

निर्व्हाळचा ‘उत्सव’ आणि आजी
शाहीन इंदुलकर
१० डिसेंबर २०२२
चिपळूणहून गुहागरच्या दिशेने जाताना वाटेत आमच्या आजीचे माहेर लागतं. आजीच्या लहानपणी ’जाधव’ हे तिथले जमीनदार होते. पाच भाऊ आणि चार बहिणी असा मोठा परिवार. सगळ्यात मोठे भाऊ- कृष्णराव. त्यांना दोन मुली होत्या. कावेरी आणि द्वारकी. थोरली कावेरी हीच माझी आजी.
पूर्वी कधीतरी गावातल्या बापट गुरुजींनी जाधव कुटुंबाला एक सल्ला दिला. तुमच्या जमिनीवर एक मारुतीचं देऊळ बांधा आणि जाधवांनी ते देऊळ बांधलं!
पुढे पा…