साऱ्याजणींचं 'खबर लहरिया' भाग १
संध्या गवळी
०१ जुलै २०२२
वर्तमानपत्र, मासिकं ह्या ठिकाणी नेहमी एक सदर चालु असत. म्हणजे लेखांची एक मालिकाच चालु असते. अश्या सदरांची गरज काय? असा ही प्रश्न बऱ्याच जणांना पडत असेल पण ह्या सदरांतुनच एका विषयाकडे बघण्याचे वेगवेगळे दृष्टिकोण आपल्याला समजतात. कोणताही विषय घेतला तर आपल्या लक्षात येतं की ह्या कडे एकाच बाजुने बघणे म्हणजे त्या विषयाला निटसा न्याय न देण्यासारखंच आहे. आणि अश्या विषयांना न्याय देण्याचे आणि त्यांच्या वे…
मिळून साऱ्याजणीतलं कथाविश्व
नीलिमा बोरवणकर
२१ जून २०२२
'मिळून साऱ्याजणी'च्या ३१ व्या वर्धापन दिनानिमित्ताने मासिकाच्या संस्थापक-संपादक स्मृतिशेष विद्या बाळ यांच्या स्मृतीला अभिवादन करण्याच्या हेतूने या मासिकानं सामाजिक, वाङ्मयीन आणि सांस्कृतिक क्षेत्रात दिलेल्या योगदानाचा अभ्यास करणारा 'विद्या बाळ अध्यासन प्रकल्प' सुरु केला गेला. “साऱ्याजणीच्या अक्षरवाटा” यी शिर्षकाने हा अभ्यास प्रकल्प पुर्ण झाला आहे. आपल्या वेगळ्या जाणीवे मधून मिळून साऱ्याजणी ह्या मा…
अस्तित्व
राम मधुघन
२१ जून २०२२
मी तेव्हा पुण्यात राहात कर्वेनगरात होतो. ऑफिस वारजे येथील रुणवाल सोसायटीत होते. तिथून वारजे पुलाजवळ उतरून, मी बहुतेकदा पायीच चालत कर्वेनगरमधील स्पेन्सर्स चौकात जायचो. २०१५ चा ऑक्टोबर महिना असावा, नेहमी प्रमाणे काम आटोपून मी ऑफिसातून निघालो. भूक लागली होती म्हणून काहीतरी खाण्याच्या शोधात मी थोडा पुढील बाजूस गेलो, तिथे कच्छी दाबेलीची गाडी लागलेली असायचीच. मी एक दाबेली ऑर्डर करून उगाच इकडेतिकडे न्याह…
महात्म्याची दुसरी बाजू : गांधी का मरत नाही
हेमंत सावळे
०७ जून २०२२
कोणत्याही व्यक्तीला कमी लेखायचं असेल तर त्या व्यक्तीच्या विरोधकाला जास्त महत्त्व द्या. कुठल्याही व्यक्तीची प्रतिष्ठा कमी करायची असेल तर त्या व्यक्तीची प्रतिमा मलिन करा. एखाद्या प्रतिष्ठित आणि नावाजलेल्या माणसाच्या दोन बाजू असतात आणि त्या दोन्ही बाजूंचा अभ्यास केल्यावर आपण कुठल्यातरी निष्कर्षापर्यंत पोचायला हवं. विरोधकांच्या कुटिल कारस्थानांना बळी पडलेल्या एका महात्म्याची प्रतिमा आज एवढी मलीन करून …
मिळून साऱ्याजणीची मुखपृष्ठे - मासिकाचा आशयघन, बोलका चेहरा
मिलिंद जोशी
०१ जून २०२२
विद्या बाळ अध्यासन प्रकल्पांतर्गत
'साऱ्याजणीच्या अक्षरवाटा'
ऑगस्ट १९८९ ते जुलै २०१९
'एक प्रवास : आत्मभान, समाजभान आणि माणूसभान जागवण्याचा'
मासिकाच्या संस्थापक-संपादक स्मृतीशेष विद्या बाळ यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी मिळून साऱ्याजणी मासिकानं ऑगस्ट १९८९ ते जुलै २०१९ या ३१ वर्षात सामाजिक, वाङ्मयीन आणि सांस्कृतिक क्षेत्रात दिलेल्या योगदानाचा अभ्यास विद्या बाळ अभ्यासन प्रकल्पांत…
पाऊस
मेरसे रोदोरेदा
०३ मे २०२२
घरातील मुख्य खोलीच्या आवराआवरीवर तिनं अखेरचा हात फिरवला. एक पाऊल मागे सरकून दाराजवळ उभं राहून तिनं खोलीकडं नजर टाकली. तिनं आदल्या रात्रीच पडदे धुतले होते. दुसऱ्या दिवशी सकाळीच त्यांना इस्त्री केली. सर्व पडद्यांना खळ घातल्यामुळे ते नव्यासारखे छान दिसत होते. पडदे फिकट पिवळ्या रंगाचे असून, त्यावर हिरवे ठिपके होते. पडद्यांना खालच्या बाजूला झालर होती. ते दोन भागात विभागले ते पडदे एका हिरव्या रिबिनीनं ब…
कमळातल्या गोष्टी
दीप्ती देवेंद्र
२६ मार्च २०२२
कमळाची रोपं अंगणात लावण्याचं स्वप्न अनेक वर्षांपासून होतं तिचं. मातीविटांनी लिंपलेलं छोटंसं तळं अंगणात असावं. त्यात कमळं फुलावीत. त्यावर फुलपाखरं, मधमाशा गुणगुणाव्यात. छोटे रंगीत पक्षी भिरभिरावेत आणि आपण तासनतास ते पाहत बसावं, असं साधं गोजिरं तिचं स्वप्न.
घरात तर जागेअभावी हे स्वप्न शक्य नव्हतं. मग, तिने तिच्या पॉटरी स्टुडिओच्या अंगणात एक प्लास्टिकचा टब ठेवला. आणि अखेर कुठून तरी कमळाच्या बिया …
संधी न मिळालेल्या समूहाची गोष्ट
ज्ञानेश्वर जाधवर
१५ मार्च २०२२
या पृथ्वीतलावावर कुठेही आपण जन्मलेलो असलो आणि जर मुख्य धारेतल्या समूहात नसलो, तर आपण जगण्यास लायक नसतो. मुख्य धारेतील सत्ताधारी अशा समूहाला बाहेर फेकत असतात. एकदा का हा समूह बाहेर फेकला की, तो मुख्य धारेतल्या संधींपासून वंचित राहतो. आणि तो वंचित राहिला की मागास बनतो; मागास बनला की, त्याच्या जगण्याची लढाई सुरू होते. मग, तो त्या जगण्याच्या आणि दोन वेळचं पोट भरण्याच्या नादात माणूस म्हणून जगणं विसरून …
‘अविनाशपासष्टी’
बाळासाहेब लबडे
१५ मार्च २०२२
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सेवानिवृत्त मराठी विभागप्रमुख प्राचार्य डॉ. अविनाश सांगोलेकर हे आद्य मराठी गझलसंशोधक म्हणून सर्वदूर सुपरिचित आहेत. त्यांचा ‘अविनाशपासष्टी’ हा ६५ निवडक गझलांचा संग्रह त्यांच्या पासष्टीतील पदार्पणाचे औचित्य साधून मुंबईच्या ग्रंथाली प्रकाशनाने १५ जानेवारी २०२२ रोजी प्रकाशित केला आहे. इ.स.१९७९पासून म्हणजे गेल्या चाळीस वर्षांपासून प्राचार्य डॉ. सांगोलेकर हे गझललेखन कर…