‘डिस्ग्रेस’ : अधःपतनाचे आख्यान विलास साळुंके २१ जुलै २०२१
दक्षिण आफ्रिकेचे नोबेल पारितोषिक विजेते लेखक जे. एम. कुट्से यांच्या ‘डिस्ग्रेस’ या कादंबरीला १९९९ चे मॅनबुकर हे नामांकित पारितोेषिक मिळाले होते. दक्षिण आफ्रिकेतील वर्णद्वेषी राजवट आणि ती संपल्यानंतरची राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक परिस्थिती यावर प्रकाश टाकणारे कथात्म साहित्य कुट्से यांनी लिहिले. त्याबद्दल एका समीक्षकाने म्हटले आहे की, कुट्से स्वत:बद्दल खोटे बोलत नाहीत आणि मानवाच्या आजच्या स्थितीब…
डांची (सांडणी) उपेंद्रनाथ अश्क १३ जुलै २०२१
पी. सिंकदर या लहान गावात बाकर या जाट मुसलमानाला आपल्या सामानाकडे लोभी नजरेने बघत असलेलं पाहून झाडाच्या सावलीमध्ये आराम करत असलेला नंदू चौधरी आपल्या मोठ्या आणि भेदक आवाजात ओरडला, “ए, ए काय करतो आहेस रे तिकडे?” हे म्हणत असताना त्याचा सहा फूट लांबीचा देह जो झाडाच्या सावलीमध्ये आराम करत पहुडला होता, तो खडबडून जागा झाला. त्याची छाती फुलून आली आणि बटणं तुटली असल्यामुळे, जाड्या-भरड्या खादीच्या कुर्त्यामध…
घराघरात, मनामनात नक्की आहे कोण? हृषीकेश पाळंदे २१ जून २०२१
अलीकडेच राजधानीतून आलेली बातमी : “आमच्या मुलांच्या वाट्याची लस परदेशात का पाठवली?” असं पोस्टर झळकवणार्‍यांविरुद्ध पोलिसांनी तातडीने कारवाई केली. मोठ्या पेपरच्या कुठल्यातरी छोट्या कोपर्‍यात आलेली ही बातमी वाचल्यावर नेहमीप्रमाणे अनेक प्रश्न पडायला सुरुवात झाली. प्रश्न जुनेच, नेहमीचेच - तेच तेच. नव्या प्रश्नांमुळे जुन्याजाणत्या विसरलेल्या प्रश्नांनाही जोर चढतो, नि त्याचं वादळ घोंघावत येतं. त्यातून…
मारिओ  अल्बर्टो मोराव्हिया ०५ जून २०२१
फिलोमेना गाढ झोपलेली असतानाच मी भल्या पहाटे उठलो. माझी उपकरणांची पिशवी घेतली. आवाज न करता मी घराच्या बाहेर पडलो आणि ग्रामचीहून मॉंटे पॅरिओलीला गेलो. तिथे एका घरात गळक्या बॉयलरची दुरुस्ती करायची होती. दुरुस्तीला किती वेळ लागेल नक्की माहीत नव्हते. कदाचित दोनेक तास सहज लागतीलच. कारण पहिला पाईप काढून तो पुन्हा बसवावा लागणार होता. काम उरकल्यावर मी बस व ट्राम पकडून  व्हिआ डे कॉरोनेरीला पोचलो. तिथेच माझं…
मित्राची गोष्ट जाई फराकटे ०८ जानेवारी २०२१
बऱ्याच वर्षांनी ‘वर्क फ्रॉम होम’च्या निमित्ताने कोकणातल्या आमच्या घरी आई-बाबांबरोबर राहण्याची संधी मिळाली. तेही बरेच दिवस. मग काय, आम्ही लॉकडाउनच्या सुरुवातीच्या दिवसांत जुन्या फोटोंचे अल्बम, आईने माझ्या आणि माझ्या बहिणीच्या शाळेच्या दिवसातल्या कपाटात सांभाळून ठेवलेल्या काही वस्तू, शुभेच्छापत्रांची थैली असं सगळं आठवणींचं गाठोडं उघडून तासनतास गप्पा मारत बसत असू. असंच एक दिवस माझ्या कप्प्यात …
अ‍ॅन फ्रँक आणि समांतर वेदनेच्या कहाण्या माधवी वागेश्वरी १० सप्टेंबर २०२०
लाल पांढर्‍या चौकटीची एक छोटी डायरी ही विसाव्या शतकातील एक ऐतिहासीक दस्तावेज बनली. सगळ्याच गोष्टींचं ‘रेकॉर्ड’ ठेवणार्‍या जर्मनीत मानवी इतिहासात घडलेल्या सर्वात मोठ्या आणि अत्यंत क्रूर वंशहत्येचा दस्तावेज लिहिला गेला, ज्यात सलग १२ वर्षं २२ देशातील ज्यू नष्ट करण्यासाठी रीतसर यंत्रणा उभी केली गेली. यातील चार वर्षं त्यांना मारून टाकण्यात आलं. त्यात ही डायरी मानवी आशावाद, चांगुलपणा आणि करुणा यांचं …
विवस्त्रा  लेस्ली नेका अरीमा ११ ऑगस्ट २०२०
संपूर्ण अनावृत्त असलेल्या त्या स्त्रीच्या ओटीपोटाखालचे केस नीट कापून व मेणाचा वापर करून आकार दिल्याने तो भाग अस्ताला चाललेल्या सूर्यासारखा दिसत होता. ती स्त्री सौंदर्य प्रसाधने आणि मलमांचे नमुने, त्यांचे फायदे दिसावेत अशा रीतीने मांडत असताना, कपडे परिधान केलेल्या स्त्रिया तिच्याकडे तुच्छतेने पाहात होत्या. "त्वचा कशी मृदू व मुलायम होते, हे तुम्ही प्रत्यक्ष पाहात आहातच", ती स्त्री डोळे मिचकावत म्हणा…
चूल ते मूल : माझं गरजेपुरतं जगणं हृषीकेश पाळंदे ०९ ऑगस्ट २०२०
गरजेपुरतं जगायला लागल्यावर कशी मजा येत गेली, हे नीट सविस्तर सांगायलाच हा लेख लिहायला घेतला आहे. लिहिता लिहिता मी उपदेशांचे डोस पाजणार नाही, असं ठरवलेलं आहे. तरीसुद्धा मधूनच मी प्रवचनकार निसर्गयोगी बाबामहाराजांच्या भूमिकेत शिरू शकतो. हे बाबामहाराज निसर्गाचा भक्तिमार्ग अनुसरणारे आहेत. त्यामुळे ते उपदेशाचे डोस मी पाजत नसून ‘तो’ पाजत आहे नि ते आपल्या सर्वांच्या भल्यासाठी आहेत. माझा जन्म पुण्यातला. …
मानीमुनी अन् मी शाश्‍वती भोसले ०७ ऑगस्ट २०२०
भटकंतीची आवड माझ्यामध्ये कुठून आली, देव जाणे. आजी-आजोबांनी झोपताना सांगितलेल्या गोष्टी आणि गायलेली अंगाई गीते यावर बालपण पोसलेलं... त्यातूनच वाचनाची आवड जोपासली गेली. प्रत्येक सफरीत जीवघेण्या संकटातून बचावून आलेला सिंदबाद हिंमत न हारता प्रसंगावधान व संयम राखून प्रत्येक संकटावर मात करतो. ‘गलिवर्स ट्रॅव्हल्स्’मधला डॉ. गलिवर सागरी सफरीवर गेला असता लिलिपुटसारखे अद्भूत अनुभव घेतो. आम्ही राहत असू ते धर्…